MSEDCL Electrical Assistant Recruitment 2024, विद्युत सहायक 5347 Post Apply Now

5/5 - (1 vote)

MSEDCL Electrical Assistant Recruitment 2024 : (MSEDCL) मध्ये ‘विद्युत सहायक” या पदासाठी ज्यामध्ये तब्बल ५३४७ रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून दिनांक ०१ मार्च २०२४ ते २० मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. (जाहिरात क्रमांक: ०६/२०२३) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हालाwww.mahadiscom.in या संकेतस्थळावर अर्ज करावे लागेल.

MSEDCL Electrical Assistant Recruitment 2024

SHORT NOTIFICATION

विभागमहाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी
एकूण जागा ५३४७
पदाचे नाव ‘विद्युत सहायक”
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याचा दिनांक    ०१ मार्च २०२४  
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक  २० मार्च २०२४
ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग: ₹२५०/- +GST
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹१२५/- + GST
परीक्षा दिनांक Notified Soon
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील व्हासामील होण्यासाठी येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हासामील होण्यासाठी येथे क्लिक करा
संपूर्ण PDF जाहिरात डावूनलोड करा  येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.mahadiscom.in

MSEDCL Electrical Assistant Recruitment Notification 2024

MSEDCL Electrical Assistant Recruitment 2024 : MSEDCL विद्युत वितरण कंपनी मध्ये “विद्युत सहाय्यक” या पदाची भरती २०२३ नुसार याची प्रक्रिया हि १ मार्च २०२४ पासून अर्ज भरायची सुरुवात तर २० मार्च २०२४ पर्यंत आहे. या भरती मधील पदे सरळसेवा पद्धतीने ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्यात येणाया आहे. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. “विद्युत सहाय्यक” या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी यशस्वीकरीत्या पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर समाविष्ट करून घेण्यात येईल.या मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वेतन गट-४ प्रमाणे वेतन मिळणार आहे.

MSEDCL Electrical Assistant Recruitment Vacancy Details 2024

MSEDCL Electrical Assistant Recruitment 2024
MSEDCL Electrical Assistant Recruitment 2024
MSEDCL Electrical Assistant Recruitment Eligibility Criteria

        शैक्षणिक पात्रता :

 1. महाराष्ट्र राज्य बोर्ड किंवा समकक्ष परीक्षा 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 2. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, नवी दिल्ली द्वारे जारी केलेले नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (इलेक्ट्रीशियन/वायरमन) किंवा दोन वर्षांचा डिप्लोमा (इलेक्ट्रीशियन) प्राप्त करून, इलेक्ट्रिकल क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्थेतून औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. /वायरमन) महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण परीक्षा मंडळाद्वारे प्रमाणित असणे आवश्यक आहे.

        वयोमर्यादा:

 1. 29 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांपर्यंत वय शिथिलता लागू आहे.
MSEDCL Electrical Assistant Recruitment Salary
 • पहिले वर्ष: उमेदवारांना मासिक वेतन करार कालावधीच्या पहिल्या वर्षात रु.१५,000/- एवढे देण्यात येतील.
 • दुसरे वर्ष: दुसऱ्या वर्षी मासिक वेतन रु.१६,000/- एवढे देण्यात येतील.
 • तिसरे वर्ष: कराराच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वर्षात, उमेदवारांना मासिक वेतन रु.१७,000/- एवढे मिळतील.
 • ‘विद्युत सहायक” म्हणून तीन वर्षांचा करार कालावधी पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला कंपनीच्या नियमांनुसार नियमित नियुक्तीसाठी समाविष्ट करण्यात येईल. त्यानंतर उमेदवाराला वेतन रचनेसह “तंत्रज्ञ” या पदावर नियुक्त केले जाईल व पदानुसार पुढील प्रमाणे मासिक वेतन देण्यात येईल. (रु.२५८८०-५०५-२८४०५-६१०-३४५०५-७१०- ५०८३५)

MSEDCL Electrical Assistant Recruitment Apply Online

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालीलप्रमाणे अर्ज भरायची प्रक्रिया दिलेली आहे.

 • ऑनलाइन अर्ज: अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in द्वारे अर्ज करा.
 • अनिवार्य ऑनलाइन फॉर्म: ऑनलाइन अर्ज भरतांना, वैध ईमेल आयडी आणि अचूक संपर्क क्रमांक प्रदान करणे अनिवार्य आहे.
 • अचूकता बाबी: सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील बरोबर असल्याची खात्री करा.
 • दस्तऐवज पडताळणी: शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि जात वैधता प्रमाणपत्रे यांसारख्या सहाय्यक कागदपत्रांसह सबमिट केलेल्या माहितीची पडताळणी करा.
 • तांत्रिक कौशल्य चाचणी: ऑनलाइन तांत्रिक कौशल्य चाचणी घ्या; प्रवेशपत्र परीक्षा केंद्र अचूक पणे टाका.
 • दस्तऐवज प्रमाणीकरण: खात्री करा की सर्व दस्तऐवज प्रामाणिक आहेत आणि प्रदान केलेल्या माहितीशी जुळतात.
 • पडताळणी प्रक्रिया: सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालय प्रमुखाची परवानगी आवश्यक आहे, पडताळणी दरम्यान आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.

MSEDCL Electrical Assistant Recruitment Exam Date

जाहिरात क्र. ०६/२०२३ नुसार ‘विद्युत सहायक” या पदाची परीक्षा हि माहे (फेब्रुवारी ते मार्च ) या महिन्यात घेण्यात येणार होती, परंतु ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ची सुरुवात आता झाली आहे.तरी परीक्षा दिनांक अद्याप माहिती नाही, यासाठी तुम्ही आमच्या चॅनेल च्या संपर्कात राहू शकता किंवा अधिकृत संकेतस्थळावर माहिती मिळवू शकता.

MSEDCL Electrical Assistant Exam Pattern 

ऑनलाइन तांत्रिक योग्यता चाचणी:

 • ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल.
 • परीक्षेसाठी किमान पात्रता निकषांमध्ये तांत्रिक विषयांचे ज्ञान, सामान्य ज्ञान आणि पदासाठी आवश्यक असलेले इतर संबंधित ज्ञान यांचा समावेश होतो.
 • ही परीक्षा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये घेतली जाईल.
 • ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्याने ऑनलाइन तांत्रिक अभियोग्यता चाचणीसाठी आमंत्रित केले जाईल.
 • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी, प्रश्नाला दिलेल्या गुणांपैकी एक चतुर्थांश (0.25) दंड म्हणून वजा केले जातील.
 • ऑनलाइन परीक्षेत पुढीलप्रमाणे विषयांचा समावेश असेल
अ.क्र. विषयप्रश्न  गुणपरीक्षा वेळ
१    तांत्रिक विषयाचे ज्ञान (Professional Knowledge)५०११०१२० मिनीट
२  सामान्य अभियोग्यता (General Aptitude) ४०२०
मराठी भाषा (Marathi Language)२०१०
 ४ संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) २०१०
एकूण १३०१५०
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना
 • उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा करिता स्वतंत्रपणे आवेदनपत्र पाठविण्यात येणार नाही, त्यासाठी उमेदवाराना महावितरण च्या
 • अधिकृत संकेतस्थळावर नियमित भेट देऊन परीक्षा पत्रक बद्दल माहाती मिळवावी लागेल.
 • ऑनलाईन परीक्षा हि कंपनी ने ठरवून दिलेल्या जिल्यातच घेतली जाईल ज्या मध्ये अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी परीक्षा घेण्यात येईल,
 • ऑनलाईन प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा तपशील देण्यात येईल.
 • परीक्षा केंद्र कार्यान्वीत करण्याकरीता आवश्यक असलेले उमेदवार यशस्वीरीत्या नोंदणी झालेले नसल्यास उमेदवाराला परीक्षा केंद्रात बसू दिले जाणार नाही.
 • अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी महावितरणाची पदासंबंधीत संपूर्ण जाहिरात वाचणे आवश्यक आहे तदनंतर अर्ज भरावे.

Leave a Comment