पीएम किसान योजना २०२४ चा 17 व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे.

5/5 - (1 vote)

पीएम किसान योजना २०२४:- आपल्या देशात शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, त्यापैकी एक म्हणजेच PM किसान योजना, या योजनेद्वारे देशातील पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक ₹ 6000 ची आर्थिक मदत दिली जाते.

आत्तापर्यंत 2019 या वर्षांपासून भारत सरकारद्वारे सुरू असलेल्या PM किसान योजनेचे 16 हप्ते भारत सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत आणि आता सर्व लाभार्थी शेतकरी पुढील हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा करत आहेत. तर लवकरच पीएम किसान योजनेच्या पुढील हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.

जर तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचे असेल की PM किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी मिळणार आहे, तर तुम्हाला आमचा या लेखाची माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचावी लागेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हि भारत सरकारद्वारे राबवली जाते. यात देशातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक ₹ 6000 ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत प्राप्त झालेले ₹ 6000 चे आर्थिक सहाय्य तीन हप्त्यांद्वारे प्रदान केले जाते आणि प्रत्येक हप्ता अंदाजे चार महिन्यांच्या अंतराने वितरित केला जातो.

पीएम किसान योजनेचा २०२४ चा १७ वा हप्ता 

पीएम किसान योजनेचा २०२४ चा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यानंतर सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. जसे की आपण सर्वांना माहिती आहे की PM किसान योजनेचे हप्ते अंदाजे दर 4 ते 5 महिन्यांनी जारी केले जातात आणि 16 वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटी जारी करण्यात आला होता.

PM किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळणे अपेक्षित आहे, जो DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रदान केला जाईल. पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता तपासण्याची प्रक्रिया हि या लेखात पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे. DBT चा १७ वा हफ्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला कि नाही तपासण्यासाठी पुढीलप्रमाणे याची संपूर्ण प्रक्रिया देण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेचा २०२४ चा १७ वा हफ्ता कधी मिळणार

पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जून मी,महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे, जरी हप्ता जारी करण्यासाठी अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.

पीएम किसान योजनेचा हप्ता तपासण्याची येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेचा हप्ता तपासण्याची प्रक्रिया 
  • पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता तपासण्यासाठी, अधिकृत pmkisan.gov.in वेबसाइट उघडा.
  • आता तुमच्या समोर मुख्य पेज उघडेल ज्यामध्ये तुम्ही “Know Your Status” या पर्यायावर क्लिक करा.
  • आता एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये नोंदणी क्रमांक टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि प्रदर्शित केलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  • त्यानंतर Get OTP या पर्यायावर क्लिक करा आणि निर्दिष्ट ठिकाणी प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचा आगामी हप्त्याची स्थिती पाहण्यास मिळेल.

Leave a Comment