How to Download Aadhar Card Online in Mobile and Update Aadhar Card in uidai-gov-in

5/5 - (1 vote)

How to Download Aadhar Card Online in Mobile: UIDAI.gov.in हे आधार कार्ड डाउनलोड करण्याचे मुख्यपृष्ठ आहे, या संकेतस्थळावरून तुम्ही तुमचे ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड मोबाईलमध्ये PDF स्वरूपात कसे डाउनलोड करू शकता, याचा सर्वोत्तम साधा व सोपा उपाय आम्ही तुम्हाला येथे देणार आहोत.व आधार कार्ड मध्ये आपला पत्ता चुकला असेल व तुम्ही ते बदलू इच्छिता तर त्याची देखील माहिती आम्ही तुम्हाला येथे देणार आहोत.आधार कार्ड कसे व किती प्रकारे आधार डाउनलोड करता येईल याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पुढील प्रमाणे देणार आहोत.

आधार कार्ड म्हणजे काय?

आधार कार्ड हे भारतातील रहिवाशांना भारत सरकारने जारी केलेले एक विलक्षण ओळखपत्र आहे. जे भारतीय असल्याची ओळख करून देते. त्यामध्ये व्यक्तीच्या बायोमेट्रिक, नाव,जन्म तारीख, पत्ता, मोबाईल नंबर, व ओळख पुराव्यासाठी फोटो असतो. आणि लोकसंख्याशास्त्रीय माहितीसह आधार क्रमांक नावाचा 12-अंकी अद्वितीय ओळख क्रमांक असतो.

आधार (UID) भारत सरकारद्वारे प्रदान केलेला 12-अंकी विशिष्ट अद्वितीय ओळख क्रमांक आहे, ज्यामुळे संपूर्ण देशभरात ओळखीची पडताळणी करता येते. ओळख पडताळणीच्या प्राथमिक कार्यासोबतच, आधार नवीन बँक खाती उघडणे, सिम कार्ड घेणे आणि ऑनलाइन वाहतूक तिकिटे बुक करणे या प्रक्रियेस सुलभ करते. नोंदणी प्रक्रियेदरम्यान, आवश्यक वैयक्तिक माहिती जसे की पत्ता, संपर्क क्रमांक, रेटिनल स्कॅन आणि फिंगरप्रिंट्स UID क्रमांक वाटपासाठी गोळा केले जातात.

मोबाईल मध्ये आधार कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करावे

ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घेण्याआधी आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी बाबतीत माहती देऊ इच्छितो, ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मुख्यत्व मोबाईल नंबर ची आवश्यकता असते, मोबाईल नंबर हा आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही तुम्हचा ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करू शकता. जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत संलग्न नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर संलग्न करू शकता.

ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे दिलेल्या तीन महत्वाच्या प्रक्रिया आहेत.

  • पहिली प्रक्रिया हि आधार कार्ड नंबर टाकून आधार कार्ड डाउनलोड करता येते.
  • दुसरी प्रक्रिया (Enrolment ID Number) एनरोलमेंट आयडी नंबर द्वारे आधार कार्ड डाउनलोड करा करता येते.
  • तीसरी प्रक्रिया (Virtual ID Number) व्हर्च्युअल आयडीद्वारे आधार कार्ड डाउनलोड करा करता येते.
आधार कार्ड नंबर टाकून आधार कार्ड डाउनलोड करा

आधार कार्ड नंबर टाकून आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रक्रिये चे अनुसरण करा.

ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा  

  • आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा uidai-gov-in
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आधार कार्डचे मुख्यपृष्ठ उघडेल.
How to Download Aadhar Card Online in Mobile
How to Download Aadhar Card Online in Mobile
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मुख्यपृष्ठ दिसेल.
  • त्यानंतर पेज वरच्या बाजूने स्क्रोल केल्यावर तुम्हाला सात पर्याय दिसतील.
  • त्या पर्यायांपैकी (Download Aadhaar) या पर्यायावर क्लिक करायच आहे.

  • (Download Aadhaar) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढीलप्रमाणे पेज दिसून येईल.

 

  • त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसेल पहिल्या ठिकाणी तुमचा १२ अंकी आधार कार्ड नंबर टाका.
  • दुसऱ्या ठिकाणी बाजूला कॅप्टचा कोड दिला असेल तो टाका.
  • त्यानंतर (Send OTP) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईलवर (OTP) आला असेल तो येथे टाका.
  • (OTP) टाकल्यानंतर (Verify and Download) या पर्यायावर क्लिक करा.
  • डाउनलोड केलेली PDF फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर इंग्रजी कॅपिटल लेटर व तुमच्या जन्म वर्षाचे अंक टाकावे लागेल.
  • उदाहरण:
    नाव: सुरेश कुमार
    जन्म वर्ष: 1990
    पासवर्ड: SURE1990
(EID) एनरोलमेंट आयडी नंबर द्वारे आधार कार्ड डाउनलोड करा

आधार नावनोंदणी आयडी (EID) (Enrollment ID Number) हा आधार नोंदणी प्रक्रियेदरम्यान व्यक्तींना नियुक्त केलेला एक अद्वितीय 14-अंकी क्रमांक आहे. उदाहरणार्थ, EID असा दिसू शकतो. (1234/56789/01234).आधारच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी हा क्रमांक महत्त्वाचा आहे. नावनोंदणी आणि आधार कार्ड डाउनलोड करणे. तुमची आधार नोंदणी स्लिप सुरक्षित ठेवा, कारण त्यात तुमचा ईआयडी नंबर व इतर आवश्यक माहिती आहे.

आधार नावनोंदणी आयडी (EID) नंबर टाकून आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रक्रिये चे अनुसरण करा.

  • आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा  

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तीन पर्याय दिसेल.
  • Aadhaar Number
  • Enrolment ID Number
  • Virtual ID Number
  • तुम्हाला या तीन पर्यायांपैकी दुसऱ्या (Enrolment ID Number) या पर्यायावर टिक करायच आहे.

  • त्यानंतर तुम्हाला तुमचा १४-अंकी (Enrolment ID Number) नंबर दिलेल्या रिक्त जागेत भरावा लागेल.
  • (Enrolment ID Number) नंबर तुमच्या पावती मध्ये असेल.तुमच्याकडे वरील दिलेली पावती प्रमाणे पावती असेल.
  • त्यानंतर तुम्हाला पावती मधील दिनांक व वेळ दिला असेल तो पण भरावा लागेल.
  • दुसऱ्या ठिकाणी बाजूला कॅप्टचा कोड दिला असेल तो टाका.
  • त्यानंतर (Send OTP) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईलवर (OTP) आला असेल तो येथे टाका.
  • (OTP) टाकल्यानंतर (Verify and Download) या पर्यायावर क्लिक करा.
  • डाउनलोड केलेली PDF फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर इंग्रजी कॅपिटल लेटर व तुमच्या जन्म वर्षाचे अंक टाकावे लागेल.
  • उदाहरण:
    नाव: सुरेश कुमार
    जन्म वर्ष: 1990
    पासवर्ड: SURE1990

VID (Virtual ID Number) व्हर्च्युअल आयडीद्वारे आधार कार्ड डाउनलोड करा

VID (Virtual ID Number) नंबर टाकून आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रक्रिये चे अनुसरण करा.

  • आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तीन पर्याय दिसेल.
  • Aadhaar Number
  • Enrolment ID Number
  • Virtual ID Number
  • तुम्हाला या तीन पर्यायांपैकी तिसऱ्या (Virtual ID Number) या पर्यायावर टिक करायच आहे.  

  • त्यानंतर तुम्हाला तुमचा १६-अंकी (Virtual ID Number) नंबर दिलेल्या रिक्त जागेत भरावा लागेल.
  • दुसऱ्या ठिकाणी बाजूला कॅप्टचा कोड दिला असेल तो टाका.
  • त्यानंतर (Send OTP) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईलवर (OTP) आला असेल तो येथे टाका.
  • (OTP) टाकल्यानंतर (Verify and Download) या पर्यायावर क्लिक करा.

आधार व्हर्च्युअल आयडी जनरेट करा (Aadhaar Virtual ID Generate)

जर तुम्ही तुमचा VID म्हणजेच (Virtual ID Number) विसरला असाल तर आम्ही तुम्हाला तुमचा Aadhaar Virtual ID Generate किंवा प्राप्त कसा करायचा याची पूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने पुढीलप्रमाणे दिली आहे.या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही आपला Aadhaar Virtual ID Generate करू शकता व मिळवू शकता.

VID (Virtual ID Number) नंबर मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या प्रक्रिये चे अनुसरण करा.

  • आधार कार्ड Aadhaar virtual id मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

ऑनलाइन आधार कार्ड Aadhaar virtual id मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे दोन पर्याय दिसेल.
  • Generate VID
  • Retrieve VID
  • तुम्हाला या दोन पर्यायांपैकी पहिल्या (Generate VID) या पर्यायावर टिक करायच आहे.  

  • त्यानंतर तुम्हाला तुमचा १२ -अंकी (Aadhaar Number) नंबर दिलेल्या रिक्त जागेत भरावा लागेल.
  • दुसऱ्या ठिकाणी बाजूला कॅप्टचा कोड दिला असेल तो टाका.
  • त्यानंतर (Send OTP) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईलवर (OTP) आला असेल तो येथे टाका.
  • (OTP) टाकल्यानंतर (Verify and Download) या पर्यायावर क्लिक करा.
  • Verify केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे VID (Virtual ID Number) पाठवला जाईल.
आधार कार्डमध्ये ऑनलाइन घरी बसल्या पत्ता बदला

तुमच्या आधार कार्डमध्ये पत्ता चुकीचा टाकला गेला असेल व तुम्हाला तुमचा आधार कार्ड मधील पत्ता बदलायचा असेल तर आता तुम्हाला आधार सेन्टर ला जायची आवश्यकता नाही कारण, आता तुम्ही तुमचा आधार कार्ड मधील पत्ता घरी बसल्या तुमच्या मोबाइल मध्ये ऑनलाइन बदलू शकता.आधार कार्ड मधील पत्ता कसा बदलायचा याची संपूर्ण प्रक्रिया पुढील प्रमाणे दिलेली आहे.

आधार कार्ड मधील पत्ता बदलण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रक्रिये चे अनुसरण करा.

  • आधार कार्ड मधील पत्ता बदलण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

आधार कार्ड मधील पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे सबमिट (Submit) हा पर्याय दिसेल.
  • सबमिट (Submit) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुढील प्रमाणे पेज उघडून येईल.

  • त्यानंतर तुम्हाला तुमचा १२ -अंकी (Aadhaar Number) नंबर दिलेल्या रिक्त जागेत भरावा लागेल.
  • दुसऱ्या ठिकाणी बाजूला कॅप्टचा कोड दिला असेल तो टाका.
  • त्यानंतर (Login With OTP) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईलवर (OTP) आला असेल तो येथे टाका.
  • (OTP) टाकल्यानंतर तुमच्या समोर तुमचा प्रोफाइल उघडून येईल तेथे तुम्हाला तुमचा पत्ता बदल माहिती भरावी लागेल.
  • तुमच्या प्रोफाइलमध्ये दाखवलेले तपशील योग्य असल्यास, कृपया टॅबवर क्लिक करा ‘मी सत्यापित करतो की
    वरील तपशील बरोबर आहेत’.
  • तुम्ही सबमिट करू इच्छित असलेल्या ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडा.
  • तुमचा ओळख दस्तऐवज अपलोड करा (2 MB पेक्षा कमी आकार; फाइल फॉरमॅट JPEG, PNG किंवा PDF)
  • तुम्ही सबमिट करू इच्छित असलेल्या ड्रॉप-डाउन मेनूमधून पत्ता दस्तऐवज निवडा.
  • तुमचा पत्ता दस्तऐवज अपलोड करा (2 MB पेक्षा कमी आकार; फाइल स्वरूप JPEG, PNG किंवा PDF).
  • तुमची संमती सबमिट करा.

आधार कार्ड मधील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला पुढीलपैकी कोणतेही एक कागदपत्रे उपलोड करावे लागेल.

ओळख आणि पत्ता दोन्हीसाठी दस्तऐवज:

  1. शिधापत्रिका
  2. मतदार ओळखपत्र
  3. किसान फोटो पासबुक
  4. भारतीय पासपोर्ट
  5. सरकारने जारी केलेले ओळखपत्र/प्रमाणपत्र ST/SC/OBC प्रमाणपत्र किंवा विवाह
  6. प्रमाणपत्र, फोटो असणे
  7. अपंगत्व ओळखपत्र / अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  8. ट्रान्सजेंडर ओळखपत्र/प्रमाणपत्र
  9. मान्यताप्राप्त निवारा गृहांद्वारे UIDAI मानक प्रमाणपत्र स्वरूपात जारी केलेले प्रमाणपत्र किंवा अनाथाश्रम
आधार कार्डसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करा

जर तुम्हाला आधार कार्ड बद्दल काही समस्या असले जसे कि, आधार कार्ड मधील नाव, फोटो, मोबाइल नंबर किंवा नवीन आधार नोंदणी करायची असेल तर तुम्ही ऑनलाइन आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्र ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता. आधार सेवा केंद्रावर खाली दिलेल्या आधार सेवांसाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता.

  • नवीन आधार नोंदणी
  • नाव अपडेट
  • पत्ता अपडेट
  • मोबाईल नंबर अपडेट
  • ईमेल आयडी अपडेट
  • जन्मतारीख अपडेट
  • लिंग अद्यतन
  • बायोमेट्रिक (फोटो + फिंगरप्रिंट्स + आयरिस) अपडेट

ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे दोन पर्याय दिसतील.
  • पहिला पर्याय हा UIDAI संचालित आधार सेवा केंद्रात अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आहे.
  • या पर्यायांमध्ये तुम्ही तुमच्या शहराचे नाव search करून अपॉइंटमेंट बुक करू शकता.
  • जर तुम्ही हा पर्याय निवडला तर तुम्हाला कारण द्यावे लागेल ते पुढील प्रमाणे वाचा.
  • आधार कार्डसाठी तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याची नोंदणी करण्यासाठी किंवा तुमच्या आधार कार्डवरील लोकसंख्या तपशील (जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल क्रमांक आणि ईमेल) किंवा बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट्स, फोटो, बुबुळ) मध्ये कोणतेही अपडेट करण्यासाठी, तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊ शकता.
  • दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकता.
  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी बाजूला कॅप्टचा कोड दिला असेल तो टाका.
  • त्यानंतर (Login With OTP) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईलवर (OTP) आला असेल तो येथे टाका.
  • (OTP) टाकल्यानंतर (अपॉइंटमेंट बुक ) या पर्यायावर क्लिक करा.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Q.आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
तुम्हाला पासपोर्ट, बँक स्टेटमेंट/पासबुक, रेशन कार्ड, व्होटर आयडी किंवा युटिलिटी बिले यासारख्या पत्त्याच्या कागदपत्रांचा पुरावा देणे आवश्यक आहे.

Q.आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी किती शुल्क आहे?
आधार कार्डवर तुमचा पत्ता अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

Q.घरी बसून आधार कार्डवरील फोटो कसे बदलावे?
सध्या तुम्ही आधार कार्डवरील तुमचा फोटो ऑनलाइन बदलू शकत नाही. फोटो बदलण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्र किंवा आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.

Q.आधार कार्डचा पत्ता किती दिवसात बदलतो?
साधारणपणे, विनंती प्रक्रिया केल्यानंतर आधार कार्डचा पत्ता अपडेट होण्यासाठी सुमारे ९० दिवस लागतात.

Q.मी माझा आधार कार्ड पत्ता कसा बदलू शकतो?
तुम्ही तुमचा आधार कार्ड पत्ता UIDAI वेबसाइटद्वारे किंवा जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन ऑनलाइन बदलू शकता.

Q.आधार कार्डवरील पत्ता बदलला आहे की नाही हे कसे तपासायचे?
तुम्ही तुमच्या पत्ता अपडेट विनंतीची स्थिती UIDAI वेबसाइला भेट देऊन किंवा mAadhaar ॲपद्वारे ऑनलाइन तपासू शकता.

Q.आधार कार्डवरील फोटो किती वेळा बदलता येतो?
तुम्ही आधार कार्डवरील तुमचा फोटो किती हि वेळा अपडेट करू शकता याची मर्यादा नाही आहे.

Q.आधार कार्डवर फोटो बदलता येतो का?
होय, तुम्ही आधार सेवा केंद्र किंवा आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन आधार कार्डवर तुमचा फोटो अपडेट करू शकता.

Q.आधारवर नवीन फोटो कसे अपडेट करायचे?
तुम्ही आधार सेवा केंद्र किंवा आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन आणि फोटो अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे सबमिट करून आधारवर तुमचा फोटो अपडेट करू शकता.

Leave a Comment